पालक पुरी किंवा पालक पराठा : आपण पालक पौस्टिक म्हणून पालकची भाजी किंवा पालक पनीर करतो त्या आयवजी पालक पुरी किंवा परोठे सुद्धा छान लागतात. ते मुलांना डब्यात द्यायला पण छान आहेत. हिरव्या रंगाची पुरी पण सुंदर दिसते.
The English version recipe for Palak Puri can be seen in this article – Here
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ कप पालक (धुवून, उकडून पेस्ट करून)
२ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून बेसन
१ टे स्पून आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
१ टी स्पून ओवा (घसटून)
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हिंग
१ टे स्पून तेल (गरम मोहन)
मीठ चवीने
पुरी तळण्यासाठी तेल
कृती : एका परातीत गव्हाचे पीठ, बेसन, आले-लसूण पेस्ट, पालक पेस्ट, ओवा, लाल मिरची पावडर, हिंग, मीठ गरम तेल घालून मिक्स करावे व लागेल तसे पाणी वापरून घट्ट पीठ मळून घेवून थोडा वेळ बाजूला ठेवावे. नंतर त्याचे मोठ्या लिंबा एव्हडे गोळे करून पुऱ्या लाटून घ्याव्या.
कढई मध्ये तेल गरम करून एक एक पुरी तळून घ्यावी. टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करावी.
टिप : जर पुरी नको असेल तर त्याचे परोठे बनवावेत.