शेवयाचे उपीट – उपमा : शेवयाची उपीट हे उत्तम लागते. आपण नेहमीच रव्याचे उपीट बनवतो. शेवयाचे उपीट बनवून बघा नक्की आवडेल. हे उपीट पौस्टिक तर आहेच कारण शेवया ह्या गव्हाच्या पासून बनवतात व ह्या उपीट मध्ये भाज्या पण आहेत. मुलांना डब्यात आवडेल व सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर करता येते.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
The English version recipe for Shevayacha Upama can be seen in the article – Here
साहित्य :
२ कप शेवया
१ मध्यम आकाराचा कांदा
१ छोटी अर्धी सिमला मिर्च
१ छोटा अर्धा बटाटा
१ छोटे अर्धे गाजर
२ हिरव्या मिरच्या
१/४ कप कोथंबीर
१ छोटे लिंबू रस
साखर व मीठ चवीने
१ टे स्पून वनस्पती तूप
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
७-८ कडीपत्ता पाने
कृती :
कढई मध्ये वनस्पती तूप गरम करून त्यामध्ये शेवया गुलाबी रंगावर मंद विस्तवावर भाजून घेवून एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
कांदा उभा पातळ चिरून घ्या, सिमला मिर्च उभी पातळ चिरून घ्या बटाट्याची साले काढून त्याचे उभे पातळ तुकडे करा, गाजर सोलून त्याचे पण उभे पातळ तुकडे करा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता, घालून मग कांदा, सिमला मिर्च, बटाटा, गाजर, हिरव्या मिरच्या घालून ४-५ मिनिट मंद विस्तवावर फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये १ ३/४ कप पाणी घालून चांगली उकळी आणून त्यामध्ये लिंबू, मीठ घालून भाजलेल्या शेवया घालून मिक्स करा वरती झाकण ठेवा व दणदणीत वाफ येवू द्या.
वरतून कोथंबीरने सजवून गरम गरम सर्व्ह करा.