खमंग कुरकुरीत आप्पे : आप्पे ही एक नाश्तासाठी बनवायची डीश आहे. ती आपण सकाळी किंवा संध्याकाळी चहा बरोबर घेवू शकतो. ही एक पौस्टिक डिश आहे. ह्यामध्ये चणाडाळ, तांदूळ व उडीद डाळ आहे ते पौस्टिक आहेत. हे मुलांना डब्यात द्यायला खूप छान आहेत. तसेच ह्याने चांगले पोट सुद्धा भरते. दोनी बाजूनी फ्राय केल्याने छान खमंग पण लागतात. गुलाबी रंगावर फ्राय केल्यामुळे दिसायला पण सुंदर दिसतात. आप्पे हा महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे.
The English language version of the Appe recipe is published in the article – Here
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ कप चणाडाळ
१/२ कप तांदूळ
१/४ कप उडीदडाळ
२ टे स्पून इडली रवा
मिक्स करण्यासाठी :
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
२ टे स्पून नारळ (खोवुन)
२ टे स्पून कोथंबीर
१ टे स्पून आले-लसून पेस्ट
१ टी स्पून हिरवी मिरची पेस्ट
फोडणी साठी :
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
१५ कडीपत्ता पाने
मीठ चवीने
तेल आप्पे फ्राय करण्यासाठी
कृती :
चणाडाळ, तांदूळ, उडीदडाळ ७-८ तास वेगवेगळे पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर मिक्सर मधून थोडे जाडसर वाटून घ्या. फार पातळ असता कामा नये. वाटून झाल्यावर त्यामध्ये इडली रवा मिक्स करून मिश्रण रात्रभर झाकून ठेवा.
आप्पे करण्या अगोदर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, खोवलेला नारळ, कोथंबीर, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, मीठ घालून मिक्स करा. काढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी करून मिश्रणात घालून मिक्स करा.
आप्पे पात्राला तेलाचा हात लावून गरम करून घ्या. व एक एक टे स्पून मिश्रण त्यामध्ये घालून कडेनी थोडे थोडे तेल घाला. २-३ मिनिट आप्पे पात्र प्लेटने झाकून ठेवा मग प्लेट काढून एक-एक आप्पे उलट करून दुसऱ्या बाजूनी पण गुलाबी रंगावर फ्राय करून घ्या.
गरम-गरम आप्पे टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.