बुंदी हलवा : बुंदी हलवा ही एक नवीन स्वीट डीश आहे. ही डीश आपण सणाला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो ही नवीन डीश सगळ्याना नक्की आवडेल. बुंदी दुधामध्ये भिजत घातल्यामुळे छान मऊ होते. व त्यामध्ये खवा घातल्याने हा हलवा अगदी चवीला वेगळा लागतो. व त्याचा केसरी रंग सुंदर दिसतो.
कधी कधी घरी आणलेले बुंदीचे लाडू उरतात तेव्हा हा हलवा बनवू शकतो पण त्यावेळी साखर कमी घाला नाहीतर हलवा खूप गोड होईल.
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
The English language version of Boondi Halwa is published in the article – Here
साहित्य :
२ कप बुंदी (मीठ नसलेली साधी चालेल)
२ कप दुध
१ १/४ कप साखर
५-६ काड्या केसर
सुका मेवा
कृती : प्रथम बुंदी दुधामध्ये १०-१५ मिनिट भिजत ठेवा. केसर दुधामध्ये भिजत ठेवा. त्यामध्ये साखर मिक्स करून मंद विस्तवावर मिश्रण आटवायला ठेवा. जेव्हा मिश्रण घट्ट व्हायला लागेल तेव्हा त्यामध्ये खवा व केसर घालून परत घट्ट व्हायला ठेवा. मिश्रण जेव्हा कढईच्या कडा सोडायला लागेल तेव्हा विस्तव बंद करून थंड करायला ठेवा. वरतून सुका मेवा घालून सजवा.