उपासाची खमंग साबुदाणा खिचडी : साबुदाणा खिचडी ही महाराष्ट्रीयन लोकांची लोकप्रिय डीश आहे. साबुदाणा खिचडी ही उपासाच्या दिवशी किंवा नाश्त्याला सुद्धा बनवता येते. तसेच लहान मुलांना पण खूप आवडते त्यामुळे त्यांना डब्यात सुद्धा देता येते. साबुदाणा खिचडी पौस्टिक तर आहेच कारण त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कुत, उकडलेले बटाटा आहे.
बनवण्याचा वेळ: 30 मिनिटे – भिजवण्याचा वेळ सोडून
वाढणी: ४-५ जण
साहित्य : २ कप साबुदाणा, १ मध्यम बटाटा (उकडलेला), १ १/२ कप शेंगदाणे (भाजून), ५-६ हिरव्या मिरच्या (लहान), १ टे स्पून साजूक तूप, १ टे स्पून लिंबू रस, १ टे स्पून साखर, १/२ कप कोथंबीर (चिरून), १/२ कप नारळ (खोवून)मीठ चवीने, १/४ कप दुध
फोडणी साठी : १ टे स्पून तेल, १ टी स्पून जिरे, ७-८ कडीपत्ता पाने
कृती: साबुदाणा आधल्या दिवशी रात्री भिजत ठेवा. बटाटा उकडून सोलून तुकडे करा. शेंगदाणे भाजून त्याचा कुट करा. मिरचीचे मोठे तुकडे करा. मग भिजवलेल्या साबुदाण्यात लिंबू रस, साखर,शेंगदाणे कुट, मीठ व कोथंबीर घालून मिक्स करा.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, कडीपत्ता पाने घालून उकडलेला बटाटा एक मिनिट फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये साबुदाणा घालून मिक्स करा. कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर दोन वाफा काढा. मधून मधून खिचडी हलवा. नंतर खिचडीच्या बाजून साजूक तूप सोडून चांगले हलवा. वरतून नारळ व कोथंबीरीने सजवा.
गरम गरम सर्व्ह करा.
टीप : साबुदाणा खिचडी बनवण्याच्या आगोदर ४-५ तास भिजत ठेवावा. साबुदाणा धुवून मग साबुदाणा बुडेल तेव्हडेच पाणी घालावे. जास्त पाणी झाले तर साबुदाणा जास्त भिजेल व खिचडी बरोबर होणार नाही किंवा पाणी कमी झाले तरी साबुदाणा बरोबर लागणार नाही. समजा साबुदाण्यात पाणी कमी पडले व साबुदाणा फडफडीत झाला तर खिचडी करण्याच्या आगोदर १/४ कप दुध घालून साबुदाणा हालवून झाकून ठेवावा.
साजूक तूप वरतून घातले तर तुपाचा छान सुगंध खिचडीला येतो.
जर हिरवी मिरची दाण्याच्या कुटा बरोबर वाटली तरी चांगली लागते.
The English language version of the Upasachi Sabudana Khichdi can be seen in the article – Here