वरण-भात : वरण-भात किंवा दाल-चावल हा पदार्थ सगळ्याच्या परिचयाचा आहे. तरी पण ही रेसीपी देत आहे. वरण -भात हा महाराष्टात मराठी लोकांचा लोकप्रिय पदार्थ आहे. वरण- भात हा सणावाराला, देवाच्या नेवेद्यासाठी बनवतात. तो पौस्टिक तर आहेच व चवीला पण छान लागतो. लहान मुलांचे हे जेवणच आहे. आजारी रुग्णाला पण वरण-भात हा गुणकारी आहे. वरण-भाता शिवाय आपले जेवण पुर्ण होत नाही.
तांदळाचा भात हा शीतल व शक्तिवर्धक आहे व पचण्या साठी पण हलका आहे. तूरडाळीचे वरण चवीला चांगले लागते. त्याने शरीराची कांती सतेज होते. व ती रक्त दोष दूर करणारी आहे. तुरीच्या वरणाला तुपाची फोडणी दिली तर त्याची चव खमंग लागते.
वरण : साहित्य १ कप तूरडाळ, २ कप पाणी, १ टी स्पून तूप, १ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून हिंग, १/४ टी स्पून हळद, मीठ चवीने
भात साहित्य : १ कप तांदूळ, २ कप पाणी
कृती : वरण : तुरडाळ धुवून त्यामध्ये २ कप पाणी घालून कुकर मधून ३ शिट्या काढा.
एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग, हळद व मीठ घालून मग शिजलेला डाळ घालून मिक्स करून चांगली उकळी आणा.
कृती भात : तांदूळ धुवून त्यामध्ये पाणी घालून कुकर मधून ३ शिट्या काढा. कुकर थंड झाल्यावर भाताचे भांडे बाहेर काढा.
गरम गरम वरण -भात सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून तूप घाला.
टीप : वरण-भात बनवण्यासाठी तांदूळ हे बासमती तुकडा किंवा आंबेमोहर वापरा त्याने चव चांगली येते. तांदूळ हा जुना वापरावा म्हणजे भात चिकट होत नाही. भाता मधील पाणी काढू नये जेव्हडे पाहिजे तेव्हडेच पाणी वापरा.
आवडत असल्यास वरणात कोथंबीर चिरून टाकू शकता. वरण – भाता वर लिंबू रस घालून छान लागते.