सध्याची विकृत शिक्षण पद्धती : सध्याची शिक्षण पद्धत योग्य आहे का? पूर्वीच्या काळी लोक शाळेत जात होते, इंजीनीयर, डॉक्टर, वकील बनत होतेच ना? तेव्हा सुद्धा त्यांना ७०%, ८०%, ९०% गुण मिळत होतच ना? तेव्हा ते पण आभ्यस करत होतच ना? ते सुद्धा दप्तराचे ओझे नेत होतच ना? पण तेव्हा दप्तराचे ओझे २-३ किलोग्राम होते व आता ५-६ किलो ग्राम इतकाच फरक आहे का?
आताची शिक्षण पद्धत फार वेगळी झाली आहे. मुल जन्माला आले की त्याच्या शिक्षणासाठी चांगली शाळा शोधायची त्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवायची. पूर्वी फक्त बालवाडी असायची व सहा वर्ष पूर्ण झाली की पहिलीच्या वर्गात मुल जायचे. म्हणजे त्याच्या मेंदूचा विकास बरोबर होवून त्यांना अभ्यासात गोडी वाटायची व अभ्यासाचे ओझे डोक्यावर वाटायचे नाही. आता सध्या मुल १८ महिन्याचे झाले की प्री स्कुल चालू होते. म्हणजे पहिलीच्या आगोदर मुल ४ वर्ष शाळेत जाते हे बरोबर आहे का?
सध्या नवीन कायदा आला आहे की दप्तराचे ओझे कमी करायचे ते बरोबर केले आहे. त्यामुळे मुलांचा पाठीचा कणा तरी नीट राहील पण त्याच बरोबर त्यांच्या डोक्याचे काय? त्यांच्या वयाच्या मानाने त्यांचा आभ्यास खूप वाटतो. प्रतेक शाळेत प्रतेक वर्गात ५० मुले व एक शिक्षिका हे गणित बरोबर आहे का? एव्ह्ड्या मुलांन कडे बघायला शिक्षकांना कसे जमणार. आजकाल आभ्यास क्रम खूप बदललेला आहे. त्यामुळे सगळ्याच पालकांना अभ्यास घ्यायला जमत नाही मग मुलांना खाजगी शिकवणी लावायची. जर सकाळची शाळा असेल तर मुल सकाळी घरातून बाहेर पडून शाळेत जाणार, शाळेतून आले की जेवण करून खाजगी शिकवणीला जाणार मग संध्याकाळी घरी आले की शिकवणीचा आभ्यास करणार व जेवणार मग झोपणार. ह्यामध्ये मुलांना खेळायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्याचे खेळायचे वय सुद्धा निघून जाणार. मुलांनी विचारले खेळायला जावू का पालक म्हणणार नाही आधी आभ्यास कर. प्रतेक ठिकाणी स्पर्धा परीक्षा त्याच्या साठी परत खाजगी शिकवणी. ज्या मुलांना १००% गुण मिळणार त्यांना काही प्रश्न नाही किंवा ज्यांची आर्थिक परीस्थिती चांगली आहे त्याचा प्रश्न नाही. बाकीच्यानचे काय?
नुसतीच एक पदवी घेवून चलणार नाही. मग दुसरे काय करायचे. दुसरे काही केले तर त्यातून आर्थिक उत्पन किती होणार त्यामध्ये भागणार का? हा एक प्रश्न. सध्या खूपच आवघड पद्धत होवून बसली आहे.
ही शिक्षण पद्धत बदलून सगळ्यांना सोईस्कर अशी शिक्षण पद्धत शिक्षण मंत्र्यानी करायला हवी. नुसते रट्टे मारून पास होण्यात काही अर्थ नाही.