साबुदाणा वडा – Sabudana Vada : कुरकुरीत साबुदाणा वडा ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय डीश आहे. साबुदाणा वडा उपासासाठी व नाश्त्याला सुद्धा बनवता येते. साबुदाणा वड्यामध्ये उकडलेला बटाटा घातल्यामुळे तो थोडा क्रिस्पी होतो व आत मधून थोडा ओलसर सुद्धा राहतो. साबुदाणा वडा लहान मोठ्यांना सर्वाना आवडतो. हे वडे तेलामध्ये तळण्या आयवजी तुपामध्ये तळले तर अजून छान लागतात.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २०-२५ बनतात
साहित्य :
२ कप साबुदाणा
२ मध्यम आकाराचे बटाटे
१ १/२ शेंगदाणे
५-६ हिरव्या मिरच्या
१/२ टी स्पून जीरा
१/२ कप कोथंबीर
१ टे स्पून लिंबू रस
१ टे स्पून साखर
७-८ कडीपत्ता पाने
मीठ चवीने
तळण्यासाठी तेल/तूप
कृती : साबुदाणा धुवून घ्या मग त्यामध्ये साबुदाणा भिजेल तेव्हडे पाणी घालून ५-६ तास झाकण घालून ठेवा.
शेंगदाणे भाजून, सोलून त्याचा जाडसर कुट करा. बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. हिरवी मिरची बारीक कापून घ्या. कोथंबीर बारीक चिरून घ्या. कडीपत्ता पाने (चिरून)
भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, शेंगदाणा कुट, हिरव्या मिरच्या, जिरे, कोथंबीर, लिंबू रस, साखर, कडीपत्ता पाने, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. व त्याचे छोटे- छोटे चपटे गोळे तयार करून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून वडे मंद विस्तवावर गुलाबी रंगावर तळून घ्या.
गरम गरम वडे दही बरोबर किंवा नारळ चटणीबरोबर सर्व्ह करा.