मोड आलेल्या मुगाचा डोसा : मोड आलेल्या मुगाचा डोसा बनवण्यासाठी हिरवे मुग वापरावे. हे मुग स्वदिस्ट व गुणकारी असतात. मुग हे पचायला हालके, थंड, डोळ्यासाठी हितकारक, तापशामक आहेत. मुगाचे पौस्टिक डोसे आजारी माणसांना हितकारक आहेत. तसेच लहान मुलांना सुद्धा गुणकारी आहेत. मुलांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहेत. सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर करायला पण चांगले आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य : २ कप मोड आलेले मुग, ३ हिरव्या मिरच्या, १ टी स्पून आले, २ टे स्पून कोथंबीर, १ टी स्पून लाल मिरची पावडर, १/४ टी स्पून हळद, एक चिमुट हिंग, मीठ चवीने, तेल
कृती : मोड आलेले मुग, हिरवी मिरची, आले मिक्सरमध्ये वाटून घ्या. मग त्यामध्ये कोथंबीर, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ घालून मिश्रण तयार करून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर तेल लावा व १/४ कप मिश्रण तव्यावर पसरून बाजूनी तेल सोडून दोनीही बाजूनी डोसा भाजून घ्या.
गरम-गरम डोसा सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Moong Dosa can be seen in the article – Here