मैकरोनी : मैकरोनी म्हंटले की लहान मुलांच्या तोंडाला पाणी येते. मायक्रोनी ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. बनवायला अगदी सोपी व लवकर होणारी आहे. ह्यामध्ये आपण सुद्धा टाकू शकतो. तसेच चीज घालून तर मायक्रोनी अप्रतीम लागते. जेव्हा मुलांना भूक लागली की काहीतरी पटकन बनवून द्यायचे असेल तर ही डीश गाजर, टोमाटो, मटार, बीन्स घालून बनवता येते.
साहित्य :- २ कप मैकरोनी (शिजवता), १ चीज क्यूब, १/४ कप गाजर, १ टे स्पून बटर, १ छोटा कांदा, १ छोटा टोमाटो, १/४ टी स्पून लाल मिरची पावडर, १/४ कप कोथंबीर, मीठ चवीने, ३ १/२ कप पाणी
कृती : गाजर धुवून त्याची साले काढून लांब- लांब पातळ फोडी करा. कांदा बारीक चिरून घ्या. टोमाटो बारीक चिरून घ्या. चीजचे छोटे तुकडे करा.
कुकरमध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा, टोमाटो घालून दोन मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ,गाजर, मीठ, कोथंबीर, पाणी व चीज घालून मिक्स करून कुकरचे झाकण लावून दोन शिट्या काढा. मैकरोनी तयार.
गरम गरम सर्व्ह करा सर्व्ह करतांना वरतून थोडा टोमाटो सॉस घाला.