कॅरमल कस्टर्ड : कॅरमल कस्टर्ड ही एक स्वीट/डेझर्ट डीश आहे. ही जेवणा नंतर सर्व्ह करता येते. ह्यामध्ये दुध, अंडी घातली आहेत त्यामुळे ती एक पौस्टिक डीश आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी पण चांगली आहे. व्ह्नीला ईसेन्स मुळे ह्याला सुगंध पण छान येतो. कॅरमल म्हणजे साखर जाळून घेणे म्हणजेच साखर ब्राऊन करणे. त्यामुळे सुरवातीला थोडी कडू गोड अशी वेगळीच चव लागते.
कॅरमल कस्टर्ड बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य :
२ कप दुध
२ मोठी अंडी
२ टे स्पून साखर
१ ब्रेड स्लाईस
३-४ थेंब व्ह्नीला ईसेन्स
कॅरमल करण्यासाठी
२ टे स्पून साखर
१ टे स्पून पाणी
कृती :
दुध व साखर मिक करून गरम करून त्यामध्ये ब्रेड त्यामध्ये बुडवून ठेवा. अंडी फेटून घ्या. दुध थंड झाले की त्यामध्ये फेटलेले अंडे, ईसेन्स घालून मिक्स करा. कुकुर मध्ये पाणी घालून पाणी गरम करायला ठेवा.
कॅरमल करण्यासाठी एका जाडबुडाच्या जस्ताच्या भांड्यात १/२ टे स्पून साखर पसरवून त्यावर १ टे स्पून पाणी घाला. व मध्यम विस्तवावर भांडे गरम करायला ठेवा. भांडे इतके गरम करायचे की भांड्यातील साखर ब्राऊन झाली पाहिजे.
भांडे विस्तवावरून खाली उतरवून त्यामध्ये दुधाचे मिश्रण ओतून घ्या. मग भांडे कुकर मध्ये ठेवून त्यावर घट्ट झाकण ठेवून झाकणावर थोडे जड वजन ठेवून कुकरचे झाकण लावून घ्या. मग मध्यम विस्तवावर ५ शिट्या काढाव्यात. कुकर थंड झाल्यावर भांडे बाहेर काढून थंड करायला ठेवा. मग बनवलेले कॅरमल कस्टर्ड काचेच्या प्लेटमध्ये उलटे काढावे म्हणजे भांड्याची खालची बाजू प्लेटमध्ये वरती आली पाहिजे. नंतर कॅरमल कस्टर्ड फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
थंड सर्व्ह करा.
The Marathi language video of this Caramel Custard Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=CWvrHaYWWAU