लेमन राईस : लेमन राईस म्हणजेच लिंबू भात होय. आपण भात राहिला तर नेहमी फोडणीचा भात करतो त्या आयवजी लेमन राईस करून बघा. हा भात खूप छान लाहतो. लहान मुलांना ड्ब्यात द्यायला अगदी ऊत्तम आहे. लेमन राईस हा पार्टीसाठी करायला पण चांगला आहे. हा राईस चवीला अगदी वेगळा लागतो.
साहित्य :
२ कप शिजवलेला भात
१/२ लिंबू रस
फोडणी साठी
१ टे स्पून साजूक तूप
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
२-३ लाल मिरच्या
५-६ कडीपत्ता पाने
७-८ काजू
२ टे स्पून शेंगदाणे
मीठ चवीने
कृती : प्रथम भात शिजवून घेवून मग थंड करायला ठेवा. (भात शिजवताना थोडे मीठ व १ टी स्पून तेल अथवा तूप घाला)
कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी व हिंग घालून मग कडीपत्ता पाने, लाल मिरची, शेंगदाणे, काजू घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये शिजवलेला भात घालून चांगले मिक्स करा व भात परतून घ्या.
सर्व्ह करतांना लिंबू रस घालून हलक्या हातांनी भात मिक्स करून घ्या.
टीप : भात अगदी मोकळा झाला पाहिजे. शिळा झालेला भात पण चांगला लागतो.
भात परतून घेतांना हळद घालू नये.
The English language version of the Lemon Rice Dish is published in the article – Here