गहू : गहू म्हंटल आपल्या डोळ्यासमोर चपाती, पराठा येतो. तसेच गव्हापासून पासून आपण पाव, केक, बिस्कीट, शिरा लाडू असे अनेक पदार्थ बनवतो. गव्हापासून रवा बनवतात. पण हा गहू किती औषधी आहे ते आपण बघूया.
गहू हा मधुर, थंड, वायू, व पचावयास जड, कफकारक, बलकारक, जुलाबावर गुणकारी आहे. तसेच गव्हाची चपाती ही बलदायक, रुचीकारक, धातूवर्धक आहे. चपाती ही थोडी पचायला जड असते पण ती जेवणात रुची आणते व ती एक उत्तम आहार आहे.
गव्हाचे पीठ मळतांना नेहमी दुध, मीठ व तेल घालून मळावे त्याने चपाती खूप छान बनते. व ती बलदायक सुद्धा आहे. गव्हा पासून पक्वाने सुद्धा बनवली जातात. गव्हाच्या सत्वा पासून बनवलेला बदामी हलवा हा खूप पौस्टिक आहे. गव्हाचा रवा हा तर खूप पौस्टिक आहे आजारी माणसाला त्यापासून शक्ती मिळते.
महाराष्ट्रातील गव्हाची चपाती छान मऊ व रुचकर आहे त्यामध्ये दुध, मीठ व तेल घालून छान मळून, तेल लावून घडीची चपाती बनवली जाते व वरतून साजून तूप लावले जाते. ही चपाती रुचकर लागते व तिच्या सेवनाने वायू दूर होतो.
गुजरात मध्ये गव्हाचे फुलके बनवले जातात ते पण पचवला हलके असतात. पण खूप पातळ फुलके बनवल्यामुळे त्यातील जीवनसत्व नष्ट होतात कारण की ते थेट विस्तवावर भाजल्याने त्याचे जीवनसत्व नष्ट होते.
उत्तर भारतात गव्हाचे जाड परोठे बनवले जातात व त्यावर तूप, लोणी वापरले जाते हे परोठे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
गहू हा पचण्यास जड आहे त्यापासून बनवलेल्या पुऱ्या, शिरा, लापशी हे पदार्थ पचायला जरा जडच असतात.
बाजारात मिळणारी केक, बिस्कीट, ब्रेड ह्यापेक्षा चपाती, लापशी हे पौस्टिक आहेत.
आपल्याला Wheat Grass (हिरवी गव्हाची रोपे) माहीत आहेतच. ही गव्हाची रोपे खूप औषधी आहेत. त्याच्या सेवनाने कॅनसर सारखे रोग बरे होतात असे म्हणतात, त्याचे सेवन अनाशी पोटी करावे असे तज्ञ सल्ला देत असतात.
गव्हाच्या हिरव्या रोपांमध्ये आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे, खनिजे, पोषकतत्त्वे आहेत व ती आपल्याला जिवंत स्वरुपात मिळतात. सकाळी अनोश्या पोटी घेतला तर त्याचे खूप फायदे होतात. फक्त तीन आठवडे हे करून बघा. त्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. डोळ्यात चमक येते तसेच गालावर लाली येते व एक महत्वाचा भाग म्हणजे आपल्या शरीरात नवचैतन्य निर्माण येते. म्हणजेच आपल्याला फ्रेश वाटते. ह्याच्या विषयी बाजारात पुस्तके सुद्धा आहेत त्याने आपल्याला योग्य मार्गदर्शन पण मिळते.
हिरव्या गव्हाच्या रोपांचा रस ह्यामुळे शरीराचा वर्ण उजळतो. पिक्त कमी होते. बलवर्धक आहे.
आहेना गहू गुणकारी तर मग आपल्या मुलांना केक, बिस्कीट, ब्रेड ह्या पासून थोडे दूर ठेवून गव्हाच्या पासून बनवलेले पदार्थ द्या ते गुणकारी आहेत. गव्हाच्या पिठात साखर, दुध, अंडे फेटून घालून त्याचे डोसे बनवा ते खूप पौस्टिक आहेत. मैद्या पासून ज्या frakee बनवतात त्या आयवजी चपातीची फ्रान्की बनवा. गव्हाच्या पिठात गुळ व मीठ घालून त्याचे डोसे सुद्धा सुंदर लागतात. व ते पौस्टिक पण आहेत.