चिकन खिमा : चिकन खिमा हा चवीस्ट पदार्थ आहे. आपण नेहमीच चिकन रस्सा बनवतो त्या आयवजी चिकन खिमा हा पदार्थ पण खूप छान लागतो. चिकन खिमा बनवायला पण सोपा आहे व लवकर बनतो. त्यावर बनवला तर त्याची चव चांगली लागते. चिकन खिमा बनवतांना बटाटे घालून किंवा अंडी उकडून घालून पण छान लागतो.
हिरवा व गरम मसाला वेगवेगळा वाटून भाजून घेतल्यामुळे चिकन खिमा खमंग लागतो.
चिकन खिमा बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२५० ग्राम खिमा
१ मध्यम आकाराचा कांदा
१ मध्यम आकाराचा टोमाटो
१/४ टी स्पून हळद
मीठ चवीने
१ छोटा बटाटा किंवा १ अंडे उकडून
अ} मसाला हिरवा
१/४ कप कोथंबीर
१०-१२ लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
२ हिरव्या मिरच्या
ब)] गरम मसाला
१/४ कप नारळ (खोवून)
१ छोटा कांदा (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१/२ टे स्पून तेल
कृती :
१) हिरवा मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
२) गरम मसाला बनवण्यासाठी एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा थोडा भाजून खोवलेला नारळ दोन मिनिट भाजून मग त्यामध्ये लाल मिरची पावडर व गरम मसाला पावडर घालून एक मिनिट भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
३) चिकन खिमा बनवण्यासाठी कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमाटो व बटाटा थोडा भाजून घ्या. मग त्यामध्ये चिकन खिमा धुवून घाला व दोन-तीन मिनिट परतून घ्या.
४) चिकन खिमा परतून झाल्यावर त्यामध्ये वाटलेला हिरवा मसाला घालून कोरडे होई परंत परतून घ्या.
५) मग वाटलेला गरम मसाला व एक पेला पाणी घालून मंद विस्तवावर चांगला शिजू द्या.
६) गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून उकडलेले अंडे कापून ठेवा. चपाती. परोठा किंवा आंबोळ्या बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the same Keema dish can be seen this the article Published – Here