नवलकोलाच्या पाल्याची भाजी Navalkol Chi Bhaji: नवलकोल ह्या भाजीला इंग्लीश भाषेत जर्मन टर्निप हे नाव आहे. ह्या भाजीचा वरचा कोवळा पाला घेवून त्याची भाजी बनवली आहे. ह्या भाजीमध्ये आपल्या शरीराला लागणारे जीवनसत्व “अ” व “क” हे जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ही भाजी नक्कीच पौस्टिक आहे. व ती अप्रतीम लागते.
साहित्य :
३ नवलकोलची वरची कोवळी पाने
१/४ कप तुरडाळ (अर्धवट शिजवून)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
मीठ चवीने
१ टे स्पून भाजणी पीठ
१ टे स्पून ओला नारळ (खोवून)
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
गुळ चवीला (अगदी थोडा)
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती :
नवलकोलची कवळी पाने धुवून बारीक चिरावीत.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग हळद, हिरव्या मिरच्या घालून शिजवलेली तुरडाळ थोडी परतावी. नंतर त्यामध्ये चिरलेला नवलकोलचा पाला घालावा व थोडे भाजी शिजण्या पुरते पाणी घालावे. व वाफेवरच मंद विस्तवावर भाजी शिजवून घ्यावी. भाजी शिजल्यावर त्यामध्ये मीठ व तुरडाळ शिजलेली घालावी व भाजणीचे पीठ घालून हलवून झाकण ठेवावे. दोन मिनिटांत झाकण काढावे व वरतून खोवलेला नारळ मिक्स करावे.
गरम गरम भाजी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावी.