रताळ्याच्या गोड चकत्या : (sweet potato) रताळ्याच्या गोड चकत्या ही एक उपासाच्या दिवशी बनवायची स्वीट डीश आहे. ही डीश महाराष्ट्रात कोकण ह्या भागात खूप प्रसिद्ध आहे. आपण रताळ्याचा उपासाचा शिरा बनवतो त्या आयवजी ही डीश बनवा. ह्या मध्ये गुळ सुद्धा वापरला आहे. त्यामुळे ह्या डीश ला वेगळीच व सुंदर चव आली आहे. बनवायला व कमी वेळात बनणारी ही डीश आहे. दिसायला पण सुंदर दिसते. तसेच गुळ व रताळे दोन्हीही पौस्टिक आहे.
The Marathi language video of this Sweet Potato Kaap can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Traditional Ratalyache Gulachya Pakatil Kaap
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहित्य :
२ मोठी आकाराची रताळी (शकरकंद)
१ कप गुळ (चिरून)
१ टी स्पून वेलची पावडर
तूप रताळ्याच्या चकत्या तळण्यासाठी
१ टे स्पून काजू-बदाम तुकडे (सजावटीसाठी)
१ टी स्पून पिठीसाखर (सजावटीसाठी)
कृती :
प्रथम रताळी चांगली धुवून घ्या. मग कुकरमध्ये ठेवून दोन शिट्या काढून घ्या. थंड झाल्यावर रताळ्याची साले काढून त्याच्या थोड्याश्या जाड-जाड चकत्या कापा.
दुसऱ्या विस्तवावर गुळ व १/२ कप पाणी मिक्स करून पाक करायला ठेवा. पाक फार घट्ट करायचा नाही. थोडसा पातळच करायचा. पाक झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड मिक्स करा.
एका कढई मध्ये तूप गरम करून रताळ्याच्या बनवलेल्या चकत्या गुलाबी रंगावर तळून घ्या. चकत्या तळून झाल्यावर गुळाच्या पाकात घालून एक मिनिट विस्तवावर भांडे ठेवून उकळी आणावी.
गरम अथवा गार सर्व्ह केले तरी चालेल. सर्व्ह करतांना वरतून काजू-बदाम घाला व थोडी पिठीसाखर भूरभुरा.