पायनापल मालपुवा : पायनापल मालपुवा ही एक स्वीट डीश आहे. ही पार्टीला किंवा सणावाराला सुद्धा करता येते.
आपण नेहमीच मालपुवा बनवतो पण मालपुवा मध्ये पायनापल घातलेतर त्याची चव वेगळीच लागते व सुगंध पण छान येतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: १५ नंबर बनतात
साहित्य : पुरी साठी
१ कप मैदा
१/२ कप रवा
१/२ कप अननस तुकडे
१ टी स्पून साखर
१ टे स्पून दुध
एक पिंच बकिंग पावडर
साखरेचा पाकसाठी
१/२ कप साखर
१/२ कप पाणी
१ टी स्पून वेलचीपूड
२-३ केसर कड्या
सजावटीसाठी
१ टी स्पून पिठी साखर
१ टे स्पून सुकामेवा
तूप मालपुवा तळण्यासाठी
कृती : साखरेच्या पाकासाठी :
एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी, साखर, वेलची पावडर, केसर घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर साखरेच्या पाक करायला ठेवा.
पुरीसाठी : रवा, मैदा, साखर, अननसाचे तुकडे, मीठ व दुध घालून मिश्रण तयार करा. कढईमधे तूप गरम करून चमच्याने छोट्या छोट्या पुऱ्या घालाव्यात व दोन्ही बाजूनी तुलन घ्याव्यात. नंतर पाका मध्ये ५-७ मिनिट ठेवाव्यात.
नंतर पाकामधून काढून एका प्लेट मध्ये ठेवाव्यात व वरतून पिठीसाखर व सुकामेवा घालून सजवावे.