गुलकंदचे मोदक – Gulkand – Rose Petal Jam Modak : गुलकंदचे मोदक हा एक अप्रतीम गोड पदार्थ आहे. मोदक म्हंटलकी गणपती बाप्पांना फार आवडतात. मोदक हे महाराष्ट्रीयन लोकांची आवडती डीश आहे. गुलकंदचे मोदक आपण संकष्टी चतुर्थीला किंवा वेगळा आकार देवून इतर सणाला सुद्धा बनवता येतात. गुलकंद घातल्यामुळे त्याला सुगंध पण चांगला येतो. त्याचे आवरण रव्याचे आहे त्यामुळे ते कुरकुरीतपण होतात.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ मोदक
साहित्य :
सारणासाठी :
१ मध्यम आकाराचा नारळ
२ कप दुध
३/४ कप साखर
२ टे स्पून गुलकंद
१ टी स्पून वेलची पावडर
५-६ काजू (तुकडे करून
५-६ बदाम (तुकडे करून)
पारी साठी :
२ कप रवा (बारीक)
१ टे स्पून तूप (मोहनसाठी)
मीठ चवीने
१/२ कप दुध व लागेलतसे पाणी
मोदक तळायला तूप
कृती : नारळ खोवून घ्या, त्यामध्ये साखर व दुध मिक्स करून शिजवायला ठेवा. मिश्रण घट्ट होई परंत शिजवावे मग त्यामध्ये वेलची पावडर गुलकंद, काजू, बदाम घालून मिक्स करावे.
बारीक रवा थोडा मिक्सरमध्ये थोडा ग्राईड करून घ्या. मग त्यामध्ये मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालून मिक्स करा. दुध व पाणी मिक्स करून रवा थोडासा सैल सर भिजवावा. (खूप सैल झाला तर मोदक खूप तुपकट होतील.)
रवा भिजवल्यावर १० मिनिट झाकून बाजूला ठेवा. नंतर भिजवलेल्या रव्याचे एकसारखे मोठ्या लिंबा एव्ह्डे गोळे बनवावे. एक एक गोळा पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून गोळा बंद करावा. आपल्याला पाहिजे तो आकार द्यावा.
कढई मध्ये तूप गरम करून विविध आकाराचे मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
हे मोदक चवीला उत्कृष्ट लागतात.
टीप : रवा वापरून मोदक करायचे असतील तेव्हा गोळे पुरी सारखे लाटून सारण भरून मोदक बंद केले की मोदक ओल्या कापडा मध्ये ठेवावे म्हणजे सुकणार नाही. व तळताना उघडणार नाही.
मोदक करतांना गोळा लाटून झालाकी सारण भरल्यावर पुरीला कडेनी अगदी थोडेसे दुध लावावे मग मोदक बंद करावे म्हणजे ते चांगले चिटकून राहतील.
The English language version of the Gulkand Modak recipe is published in this – Article.