कांचीपुरम इडली : कांचीपुरम इडली ही डीश साऊथ मध्ये लोकप्रिय आहे. पण साऊथ मधील पदार्थ हे पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. मी ह्या इडलीची सोपी पद्धत दिली आहे.
साहित्य :
१ १/२ कप उकड्या तांदूळ
१ कप उडीद डाळ
१/२ टी स्पून हिंग
१ टी स्पून सुके आले (वाटून)
१ टी स्पून जिरे
२ टे स्पून तेल
२ टे स्पून तूप
८-१० कडीपत्ता पाने
मीठ चवीने
कृती :
तांदूळ व उडीद डाळ वेगवेगळी ४ तास भिजत ठेवा. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. मग त्यामध्ये हिंग, मिरे पावडर, जिरे, मीठ, सुके आले घालून मिक्स करून मिश्रण १२ तास झाकून ठेवा म्हणजे छान फुगून येईल व इडली हलकी होईल.
मिश्रण छान फुगून आल्यावर त्यामध्ये गरम तेल, तूप व कडीपत्ता पाने घालून मिक्स करा.
कुकरमध्ये पाणी गरम करून शिटी काढून ठेवावी व इडली १२-१५ मिनिट वाफेवर करून घ्यावी. किंवा इडली पात्रामध्ये बनवून घ्यावी. इडली झाल्यावर त्याचे त्रिकोणी तुकडे करावे व चटणीबरोबर सर्व्ह करावे.
The English language version of the Kanchpuram Idli recipe is published in this – Article