गोडे वालाची उसळ : गोडे वालाची उसळ ही एक महाराष्ट्रीयन पद्धतीची उसळ आहे. ह्यामध्ये चिंच-गुळ व गोडा मसाला वापरला आहे, त्यामुळे ह्याची चव सुंदर व खमंग लागते. ही उसळ चपाती बरोबर सर्व्ह करता येते.
साहित्य :
१ कप गोडेवाल
१ छोटा कांदा
२ आमसूल (किवा १ टी स्पून चिंच कोळ)
१ टी स्पून गोडा मसाला
१ टी स्पून गुळ
१ टे स्पून नारळ (खोवून)
१ टे स्पून कोथंबीर
मीठ चवीने
फोडणी साठी
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून मेथ्या दाणे
४-५ लसून पाकळ्या
१/४ टी स्पून हिंग
७-८ कडीपत्ता पाने
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
कृती :
प्रथम गोडेवाल ७-८ तास भिजत ठेवा मग पाणी काढून १०-१२ तास तसेच ठेवा म्हणजे त्याला छान मोड येतील. मोड आल्यावर ५ मिनिट कोमट पाण्यात घालून त्याची साले काढून घ्या. (
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी. जिरे, मेथ्या, हिंग, कडीपत्ता, कांदा घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद मीठ घालून सोललेले वाल घालून १ कप पाणी घालून मिक्स करून कढई वर झाकण ठेवून त्यावर थोडेसे पाणी घालून मंद विस्तवावर १०-१२ मिनिट शिजू द्या. मधून-मधून हलवून घ्या. पन वाल खूप शिजवता कामा नये नाहीतर त्याचा लगदा होईल व त्याची चव बिघडेल.
मग त्यामध्ये गोडा मसाला, आमसूल किंवा चिंच कोळ, गुळ घालून १/४ कप पाणी घालून २-३ मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये नारळ व कोथंबीर घालून मिक्स करून एक मिनिट गरम करून घ्या.
गरम गरम चपाती बरोबर सर्व्ह करा.
The Godya Valachi Usal preparation method in Marathi is published in this – Article