होम मेड चॉकलेट : (Homemade Chocolate) चॉकलेट म्हंटल की लहान मुलांन पासून मोठ्या परंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट आपण घरीच बनवली तर किती छान होईल, परत कमी खर्चात व कमी वेळात बनवता येईल. घरी आपल्याला वेगवेगळ्या शेपमध्ये व वेगवेगळ्या टेस्टमध्ये बनवता येतात. चॉकलेट हे वाढदिवसाला, सणाला, जर कोणी नाराज असेलतर मनवण्यासाठी उपयोगी पडते. रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा देता येईल.
साहित्य :
डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट हे बेसचे प्रकार आहेत. ह्या तीनही बेसने आपण घरी वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट घरी बनवू शकतो. हे बेस बाजारात सहज मिळतात. माँरडे किंवा बेल्जियम ह्या कंपनीचे बेस वापरावेत. एक बेस ५०० ग्रामचा असतो. एका बेस मध्ये ३५ मध्यम आकाराची चॉकलेट बनवता येतात.
वेगवेगळी चॉकलेट बनवण्यासाठी ड्रायफ्रुट, डेसीकेटेड कोकनट, बिस्कीट, मावा, चीज, चॉकलेट मोल्ड, बटर पेपर, डिझाईनचा पेपर पँकिंग साठी
आपल्याला जेव्हडी चॉकलेट बनवायची आहेत तेव्हडेच बेस घ्यावे. चॉकलेट बनवतांना डबल बाँयलिंग पद्धतीने बेस विरघळवून घ्यावा. (डबल बाँयलिंग पद्धतीने म्हणजे एक मोठ्या आकाराचे जाड बुडाचे भांडे व अजून एक लहान आकाराचे भांडे घेवून मोठ्या भांड्यात १ ग्लास पाणी गरम करायला ठेवा व बेसचे तुकडे करून लहान आकाराच्या भांड्यात ठेवून ते भांडे गरम पाण्याच्या भांड्यात ठेवून मंद विस्तवावर बेस विरघळवून घ्यावा. बेस विरघळण्यासाठी १०-१२ मिनिट लागतात.) बेस विरघळल्यावर चमच्याने चांगला हलवून घेवून ५ मिनिट थंड करायला ठेवावा मगच मोल्ड मध्ये चमच्यानी बेस घालून मोल्ड फ्रीजमध्ये पाच मिनिट ठेवावा. मग बाहेर काढून मोल्ड मधील चॉकलेट काढून बटर पेपरवर ठेवावी व डिझाईनच्या पेपरमध्ये पँक करावीत.
ह्या पद्धतीने आपण बेस विरघळवून घेवून चॉकलेट बनवू शकतो. चॉकलेटमध्ये बरेच प्रकार आहेत त्यातील काही प्रकार
Making Dairy Milk Chocolate Marathi Recipe
Making Kit Kat Chocolate Marathi Recipe
Making Fruit and Nut Chocolate Marathi Recipe
Making Milky Bar Chocolate Marathi Recipe
Pineapple Chocolate Recipe in Marathi
Making Dry Fruit Chocolates Marathi Recipe
Making Rum Ball Chocolates Marathi Recipe
Making Chocolate Modak Marathi Recipe
Cheese or Mawa Chocolate Balls Marathi Recipe
Chocolate Truffles Recipe in Marathi