चॉकलेट फ्रुट एन नट हे कसे बनवायचे ते मी अगदी सोप्या पद्धतीने दिले आहे. ड्राय फ्रुट व चॉकलेट हे दोन्ही बरोबर चांगले लागते.
चॉकलेट फ्रुट एन नट (Fruit and Nut) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Preparation Process
साहित्य :
डार्क चॉकलेट बेस व ड्राय फ्रुटचे तुकडे, मोल्ड
कृती :
चॉकलेट बेस घेवून डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्यानी हलवून घेवून त्यामध्ये ड्राय फ्रुटचे तुकडे घालून हलवून ५ मिनिट थंड करायला बाजूला ठेवावा. मोल्ड घेवून त्यामध्ये चमच्यानी बेस घालून, मोल्ड सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये पाच मिनिट ठेवावा. पाच मिनिट झाल्यावर मोल्ड फ्रीज मधून काढून त्यातील चॉकलेट बटर पेपर वर काढून ठेवावीत मगच त्याला नंतर पेपरमध्ये गुंडाळून घ्यावीत.