चॉकलेट बदाम/ काजू/ पिस्ता / कीस-मिस (चॉकलेट Almonds, Cashew Nuts, Kis-mis, Pista) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Making Method
लहान मुले ड्राय फ्रुट खायला फार कंटाळा करतात. त्यांना असे करून द्या मग ते पटकन खातील. चवीला अप्रतीम लागतात. तसेच घरात पार्टी असेल तर ड्रिंक्स बरोबर हे सर्व्ह करायला पण छान आहेत.
चॉकलेट बदाम/ काजू/ पिस्ता / कीस-मिस वेळ: ३० मिनिट
वाढणी: आपण जेव्हडे ड्राय फ्रुट घेवू तेव्हडे
साहित्य :
चॉकलेट डार्क बेस, मिल्क बेस व व्हाईट बेस, बदाम, काजू, पिस्ता, कीस-मिस
कृती :
चॉकलेट डार्क बेस, मिल्क बेस व व्हाईट बेस घेवून तीनही वेगवेगळे डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. एका चमच्यानी हलवून घेवून ५ मिनिट थंड करायला बाजूला ठेवावा. बदाम थोडे गरम करून गार करून घ्या. मग विरघळवलेल्या बेसमध्ये घालून मग बटर पेपरवर ठेवून फ्रीजमध्ये ५ मिनिट ठेवा.