चॉकलेट रम बाँल (Chocolate Rum Balls) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Preparation Method
चॉकलेट रम बाँलमध्ये डेसिकेटेड कोकनट, ओरीओ बिस्कीट व रम वापरली आहे त्यामुळे ह्याची चव खूपच छान येते. परत वरतून चॉकलेट सॉस वापरला आहे त्यामुळे हे चॉकलेट बघूनच तोंडाला पाणी सुटते.चॉकलेट रम बाँल हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत.
चॉकलेट रम बाँल बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४० बॉल
साहित्य :
५०० ग्राम चॉकलेट डार्क बेस
१/२ कप डेसिकेटेड कोकनट
१० ओरीओ बिस्कीट (चुरा)
२ टी स्पून रम किंवा वाईन ( रम वाईनचे प्रमाण हे ५०० ग्राम बेस साठी आहे)
चॉकलेट सॉस
कृती :
चॉकलेट बेस घेवून डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्यानी हलवून घेवून ५ मिनिट थंड करायला बाजूला ठेवावा. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट, ओरीओ बिस्कीट, रम किंवा वाईन घालून मिक्स करून त्याचे गोल गोळे बनवून त्यावर थोडा चॉकलेट सॉस घालून मग फ्रीजमध्ये ५ मिनिट ठेवावे.