सोया मोदक Soya Granules Stuffing Modak: सोया हे किती पौस्टिक आहे ते सर्वांना माहीत आहे. सोयाचे मोदक टेस्टी लागतात. सोया ग्रान्युल हे बाजारात सहज उपलब्द आहेत. फक्त आधी पाण्यात भिजत घालून मग मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्या. सोया मोदक किंवा समोसे हे संध्याकाळी नाश्त्याला बनवायला छान आहेत. तसेच आपल्याला पाहिजे तो आकार देता येतो.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १०-१२ बनतात
साहित्य :
आवरणासाठी :
२ कप मैदा
३ टे स्पून रवा
२ टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
थोडे कोमट पाणी
सारणा साठी :
१ टे स्पून तेल
१ मध्यम आकाराचा कांदा
१ छोटा टोमाटो
१ कप सोया
१/२ कप मटार दाणे
१ टी स्पून लिंबू रस
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून गरम मसाला
१/४ टी स्पून हळद, कोथंबीर
मीठ चवीने
तेल मोदक तळण्यासाठी
कृती :
सोया ग्राईड केल्यावर ३-४ मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवावे. मग हातानी पाणी दाबून कादून बाजूला ठेवावे.
कांदा व टोमाटो चिरून घ्या. मटारचे दाणे थोडे शिजवून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून कांदा, टोमाटो व मटारचे दाणे थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला , मीठ व सोया घालून १/२ कप पाणी घालून थोडे कोरडे होई परंत शिजवून घ्या. वरतून कोथंबीर घालून मिक्स करा.
रवा, मैदा,मीठ, गरम तेलाचे मोहन घालून कोमट पाण्यानी पीठ घट्ट मळून घ्या. मग १० मिनिटानी त्याचे मोठ्या लिंबा एव्ह्डे गोळे करून पुरी सारखे लाटून त्यामध्ये १ टे स्पून सारण भरून पुरी बंद करावी व त्याला पोटली सारखा आकार द्यावा.
कढई मध्ये तेल गरम करून गुलाबी रंगावर मोदक तळून घ्या.
Similar Soya Stuffing is used to prepare Soys Samosas, the recipe in English is published in this – Article