चॉकलेट मावा बाँल किंवा चॉकलेट चीज बाँल (Chocolate Mawa Balls or Chocolate Cheese Balls) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Basic Chocolate Making Method
अशा प्रकारचे चॉकलेट बनवण्यासाठी मावा अथवा चीज वापरले आहे, मावा वापरल्यामुळे चॉकलेटची चव अगदी शाही लागते व चीज तर मुलांना खूप आवडते त्यामुळे त्याची चवपण अगदी अप्रतीम लागते. चॉकलेट सॉस वापरल्यामुळे ह्याची चव किंचित कडवट येते पण खूप सुंदर लागते.
चॉकलेट मावा बाँल किंवा चॉकलेट चीज बाँल बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४० बाँल
साहित्य :
५०० ग्राम चॉकलेट डार्क बेस
२०० ग्राम मावा किंवा चीज
चॉकलेट सॉस
कृती :
चॉकलेट बेस घेवून डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्यानी हलवून घेवून ५ मिनिट थंड करायला बाजूला ठेवावा. मग माव्याचे गोल गोळे बनवून विरघळवलेल्या बेस मध्ये डीप करून बटर पेपरवर ठेवा. वरतून थोडेसे चॉकलेट सॉस घालून मग फ्रीजमध्ये पाच मिनिट ठेवा.