झटपट मसाले भात Quick Masale Bhat : मसाले भात म्हंटले की महाराष्ट्रीयन लोकांची आवडती डीश आहे. हा भात सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते दिले आहे. ह्या मध्ये भाज्या घातल्यामुळे ह्या छान चव येते. मसाले भात हा आपण सणावाराला किंवा इतर दिवशी पण करता येतो.
झटपट मसाले भात बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप बासमती तांदूळ
२ कप भाज्या (अर्धवट शिजवून)
(गाजर, फ्लॉवर, कोबी, मटार, श्रावण घेवडा, शिमला मिर्च, बटाटा ह्या भाज्या सोलून बारीक तुकडे करून घ्या.)
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
१ टे स्पून आले-लसून पेस्ट
१ टी स्पू गरम मसाला
१ टे स्पून लिंबू रस
१ टे स्पून तूप
१/४ कप नारळ (खोवून)
१/४ कप कोथिंबीर
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
२-३ तमलपत्र
५-६ काळे मिरे
२ दालचीनी तुकडे
३ लवंगा
१/२ टी स्पून शहाजिरे
४-५ हिरवे वेलदोडे
१/४ टी स्पून हळद
कृती :
तांदूळ धुवून बाजूला ठेवा. भाज्या चिरून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. नारळ खोवून, कोथंबीर बारीक चिरून घ्या.
कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमलपत्र, मिरे, शहाजिरे, लवंग, दालचीनी, वेलदोडे घालून, त्या मध्ये कांदा व आले-लसून पेस्ट घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये तांदूळ घालून थोडे परतून घ्या. तांदूळ परतून झाल्यावर त्यामध्ये सर्व भाज्या, मीठ, गरम मसाला, लिंबू व ४ कप गरम पाणी घालून एक चमचा तूप घालून ढवळून कुकरचे झाकण लावून घ्या व दोन शिट्या काढा.
गरम गरम भात सर्व्ह करा. मसाले भात सर्व्ह करतांना वरतून खोवलेला नारळ व कोथंबीर घाला.
An English language version of the Masale Bhat recipes is published in this – Article