पडवळची भाजी (Padwal Chi Bhaji) : पडवळची भाजी चवीला खूप छान लागते. ह्या भाजी मध्ये शेगदाणे कुट घातला आहे व बेसन घातल्यामुळे भाजी थोडीसी कोरडी होते. पण चव मात्र छान येते. माझी आज्जी श्रावण महिन्यात नेहमी करायची व सगळेजण आवडीने खायचे.
पडवळची भाजी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ३ जणासाठी
साहित्य :
२५० ग्राम पडवळ
१ टे स्पून शेगदाणे कुट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टे स्पून बेसन
१ टी स्पून लिंबू रस
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती :
पडवळ धुवून बिया काढून बारीक चिरून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, लाल मिरची पावडर, मीठ, चिरलेला पडवळ घालून मिक्स करून कढई वर झाकण ठेवून मंद विस्तवावर भाजी शिजू द्यावी. मग त्यामध्ये शेंगदाणे कुट व बेसन घालून मिक्स करून भाजी परत २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्यावी.
वरतून लिंबू पिळून मिक्स करून चपाती बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Padwal Vegetable Preparation is published in this – Article