घोसाळ्याची भाजी Ghosala Bhaji : घोसाळ्याची [smooth luffa] भाजी ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. घोसाळ्याची भाजी बनवतांना त्यामध्ये चणाडाळ वापरली आहे त्यामुळे त्याची चव चांगली लागते. नारळ घातल्यामुळे भाजी चवीस्ट लागते. ही भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर सुंदर लागते.
घोसाळ्याची भाजी Ghosala Bhaji बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ३ जणासाठी
साहित्य :
२ मोठी घोसाळी
२ टे स्पून चना डाळ
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१ टे स्पून नारळ (खोवून)
१ टे स्पून कोथंबीर
१ टी स्पून जिरे
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
कृती :
घोसाळ्याची साले काढून त्याच्या फोडी कराव्यात. चण्याची डाळ २-३ तास भिजत ठेवा. मग त्यामध्ये मीठ, जिरे व हिरवी मिरची घालून डाळ वाटून घ्यावी.
कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग घालून घोसाळूच्या फोडी घालून १/४ कप पाणी घालून मंद विस्तवावर भाजी शिजवून घ्यावी. मग त्यामध्ये वाटलेली डाळ घालून मंद विस्तवावर परतून घेवून वर डाळीचा रंग बदलला की त्यात साखर, नारळ, कोथंबीर घालून मिक्स करून घ्या. गरम गरम भाजी चपाती बरोबर सर्व्ह करा.
The English version of the Ghosale Vegetable Dish is published in this – Article