झटपट खमंग ढोकळा (Zatpat or Instant Khamang Dhokla) : ढोकळा म्हंटले की गुजराती लोकांची स्पेशल डीश आहे. पण ती आता सगळी कडे लोकप्रिय झाली आहे. हा इनस्टंट खमंग ढोकळा अगदी कमी वेळात व चवीला फार चवीस्ट होतो. कोणी पाहुणे अगदी अचानक आले किंवा जेवणात साईड डीश म्हणून करता येतो. तसेच नाश्त्याला सुद्धा करता येतो.
The English language version of the Instant Khaman Dhokla Recipe can be seen in this – Article
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ १/२ बेसन
१ १/२ कप पाणी
१ टी स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून मीठ
४ टी स्पून तेल
१ चिमुट हिंग व हळद
२ टी स्पून साखर
१ टी स्पून लिंबू रस
१ टे स्पून इनो-फ्रुट सॉलट
१/४ कप कोथंबीर
१/४ कप नारळ खोवलेला
फोडणीसाठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
७-८ कडीपत्ता पाने
कृती : कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवा. ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या डब्याला आतून तेल लावून घ्या. एका भांड्यामध्ये बेसन, आले-लसूण पेस्ट, मीठ, हिंग, हळद, साखर, लिंबू रस व पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. एका छोट्या कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये इनो घालून मिक्स करून बेसनच्या मिश्रणात घाला व मिक्स करून तेल लावलेल्या डब्यात मिश्रण ओतून डबा कुकरमध्ये ठेवा. डब्याला घट्ट झाकण लावा. कुकरचे झाकण लावून शिटी काढून १२-१५ मिनिट ढोकळा वाफेवर शिजवून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून मोहरी व कडीपत्ता घालून फोडणी शिजलेल्या ढोकल्यावर घाला. त्याचे तुकडे करून कोथंबीर व खोवलेल्या नारळाने सजवा.