चटपटीत मटकीची भेळ (Chatpati Healthy Sprout Bhel) : भेळ म्हंटले की तोंडाला पाणी सुटते त्यात मटकीची भेल म्हंटले की ती पौस्टिक आहे ते सगळ्यांना माहीत आहेच. ही चटपटीत भेळ खूप चवदार लागते. तसेच डायटिंग करणाऱ्यांना ही भेळ फायदेशीर आहे.
चटपटीत मटकीची भेळ बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य :
१ कप मोड आलेली मटकी
१ कप चुरमुरे
१ कप फरसाण
१ मोठ्या आकाराचा कांदा
१ मोठ्या आकाराचा टोमाटो
१ छोटी काकडी
२ हिरव्या मिरच्या
मीठ व साखर चवीने
१ छोटे लिंबू रस
१/४ कप कोथंबीर
कृती : कांदा, कोथंबीर, टोमाटो बारीक चिरून घ्यावे. काकडी चोचून घ्यावी किंवा बारीक चिरून घ्यावी. हिरवी मिरची वाटून घ्यावी.
एका भांड्यात चिरलेले कांदा, कोथंबीर, काकडी व टोमाटो घेवून हिरवी मिरची घालावी व मोड आलेली मटकी घालावी. वरतून मीठ, फरसाण, घालून मिक्स करून मग त्यामध्ये लिंबू रस व साखर घालून हलक्या हाताने हलवून घ्यावे. मग त्यामध्ये चुरमुरे घालून मिक्स करून वरतून कांदा, कोथंबीर, टोमाटोने सजवावे व चटपटीत भेळ सर्व्ह करावी.
Nice recipe. I havent tried with cucumber but sounds interesting!!