Khamang Spicy Masala Rasgulla Marathi Recipe

मसालेवाले रसगुले : रसगुल्ले हे आपणाला सर्वाना माहीतच आहेत. त्याच्या पासून आपण मसालेवाले रसगुले ही एक टेस्टी ग्रेव्ही बनवू शकतो. ही ग्रेव्ही आपण पार्टी साठी करू शकतो किंवा सणाच्या दिवशी सुद्धा करू शकतो.

मसालेवाले रसगुले बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य : मसाला ग्रेव्ही साठी
१ कप नारळ (खोवून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ हिरवी मिरची
१/४ टी स्पून हळद
१/२ कप टोमाटो प्युरी
१ टे स्पून काजू बदाम पेस्ट
१ टे स्पून फ्रेश क्रीम
१ टी स्पून साखर मीठ चवीने

फोडणी साठी :
१/२ टे स्पून तेल
१ छोटा कांदा
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१/४ टी स्पून कसुरी मेथी

रसगुले बनवण्यासाठी रेसिपी पहा. – Rasgulla Making Recipe

कृती : खोवलेला नारळ, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, हळद व १/४ कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून कांदा, आले-लसूण पेस्ट, कसुरी मेथी घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला मसाला घालून ५ मिनिट मंद विस्तवावर परतून घेवून त्यामध्ये टोमाटो प्युरी घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये एक कप पाणी, मीठ, साखर, काजू-बदाम पेस्ट, फ्रेश क्रीम घालून ४-५ मिनिट शिजू द्या.

गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना ग्रेवीमध्ये रसगुले घालून वरतून कोथंबीरीने सजवा. पराठा बरोबर किंवा पुरी बरोबर सर्व्ह करा.

the English language version of the Masala Rasgulla Gravy is published in this – Article

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.