चुरमुऱ्याचा चिवडा (Murmure – Churmure -Puffed Rice) : चुरमुरे वा मुरमुरे ह्या पासून आपण भेळ, लाडू किंवा चिवडा बनवतो. चुरमुऱ्याचा चिवडा हा लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. चुरमुरे हे पौस्टिक सुद्धा आहेत. हा चिवडा चवीला फार छान लागतो महाराष्ट्रात हा चिवडा फार प्रसिद्ध आहे. मुलांना दुपारी दुधा बरोबर द्यायला पण चांगला आहे. दिवाळीच्या फराळासाठी सुद्धा चुरमुरे चिवडा बनवू शकतो. सर्व्ह करतांना शेव, कांदा, कोथंबीर घालून सजवून द्या.
साहित्य :
३ कप चुरमुरे (ताजे)
मीठ व पिठीसाखर चवीने
फोडणी साठी :
1 1/2 टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
७-८ कडीपत्ता पाने
२ टे स्पून शेंगदाणे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
सजावटीसाठी :
१/४ कप बारीक शेव
१/४ कप कोथंबीर
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
१ छोटा टोमाटो (बारीक चिरून)
कृती : चुरमुरे ताजे घ्यावेत. एका कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, कडीपत्ता पाने, शेंगदाणे घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, हळद घालून चुरमुरे घालून मिक्स करा. मंद विस्तवावर थोडे परतून घेतल्यावर पिठीसाखर साखर घालून परत १-२ मिनिट परतून घ्या.
चुरमुरे चिवडा सर्व्ह करतांना वरतून कांदा, कोथंबीर, टोमाटो व शेव घालून सजवून मग द्या.
The English language version of the Murmura Chivda is published in this – Article