सांडग्याची भाजी अथवा आमटी – Sandgyachi Bhaji Amti: सांडग्याची भाजी ही खूप चवीस्ट व खमंग लागते. हे सांडगे घरी बनवता येतात. महाराष्ट्रात हे सांगाडे खूप लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात प्रसिद्ध आहेत. कधी घरात भाजी नसली तर ह्या सांडग्याची भाजी बनवता येते. सांगाडे बनवण्यासाठी मुगाची डाळ, हरभरा डाळ, वापरली जाते. सांडग्याची भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते.
प्रथम हे सांडगे घरी कसे बनवायचे ते आपण पाहूयात.
The video for making Chana Dal Sandge at home in Marathi can be seen on our YouTube Channel – Maharashtrian Traditional Cahna Dal Sandgyachi Bhaji Amti
साहित्य :
सांगाडे घरी कसे बनवायचे
४ कप मुगाची डाळ
२ कप हरभरा डाळ
६ हिरव्या मिरच्या
७ लसूण पाकळ्या
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून हळद
मीठ चवीने
कृती :
ज्या दिवशी सांडगे बनवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी रात्री डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी सर्व काढून घ्यावे. मिक्सरमध्ये पाणी न घालता भिजवलेल्या डाळी, हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर, लसूण, हळद व मीठ घालून थोडे जाडसर वाटून घ्यावे.
एका प्लास्टिकच्या पेपरवर हाताने छोटे-छोटे वडे घालावेत व कडकडीत उन्हात सांगडे वाळवावेत. वाळल्यावर डब्यात भरून ठेवावे.
सांडग्याची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
सांडग्याची भाजी :
१ कप वाळलेले सांडगे
१ मध्यम आकाराचा कांदा
१ टी स्पून आले-लसूण पेस्ट
१ टे स्पून कांदा लसूण मसालामीठ चवीने
कोथंबीर सजावटीसाठी
१/२ कप तेल
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती :
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये सांडगे गुलाबी रंगावर तळून घ्यावे व बाजूला ठेवावे. मग एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कांदा व आले-लसूण पेस्ट घालून २-३ मिनिट कांदा गुलाबी रंगावर भाजून घेवून त्यामध्ये हळद, मीठ, कांदा लसूण मसाला घालून तळलेले सांडगे घालून १/२ कप पाणी घालावे व चांगली वाफ येवू द्यावी. वरतून कोथंबीर घालावी. जर ही भाजी थोडी पातळ करायची असेल तर २ कप पाणी घालून थोडा खोवलेला नारळ वाटून घालावा. ही आमटी सुद्धा अप्रतीम लागते.
गरम गरम सांडग्याची भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
The video for making Chana Dal Sandge at home in Marathi can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=GMb_4hHXiUI