अंबाडीची – आंबट चुका – Ambat Chuka भाजी : अंबाडीची- Green Sorrel in English and Gongura in Hindi भाजी ही एक पालेभाजी आहे. हे भाजी आंबट असते त्यामुळे ह्या भाजीमध्ये गुळ घालतात. अंबाडीची भाजी हे पातळ भाजी बनवली जाते व ती ज्वारीच्या भाकरी बरोबर सर्व्ह केली जाते. ही भाजी चवीला अगदी उत्कृष्ट लागते. ह्यामध्ये तुरडाळ व हरभरा डाळीचे पीठ वापरले आहे त्यामुळे भाजी एकजीव होते. भाजीचे चोथा पाणी होत नाही.
अंबाडीची – आंबट चुका – Ambat Chuka भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ आंबाडीची जुडी
१/२ कप तुरडाळ
१/४ कप शेगदाणे
१ टे स्पून हरभरा डाळ
मीठ व गुळ चवीने
फोडणी साठी
१/४ कप तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
४ लाल सुक्या लाल मिरच्या
८-१० लसूण पाकळ्या (ठेचून)
कृती
अंबाडीची भाजी निवडून धुवून बारीक चिरून घ्यावी. एका पातेल्यात चिरलेली भाजी, तुरडाळ, हरभरा डाळ, शेगदाणे व १/४ कप पाणी घालून कुकरमध्ये २-३ शिट्या काढून घ्याव्यात. नंतर भाजी कुकर मधून काढून चांगली घोटवी व घोटतांना हरभरा डाळीचे पीठ व लाल मिरची पावडर मिक्स करावी म्हणजे भाजी चांगली मिळून येईल.
एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, लसूण, लाल सुकलेल्या मिरच्या, हळद, मीठ घालून शिजलेली भाजी घालावी व चांगली उकळी आणावी, मग त्यामध्ये गुळ घालून परत चांगली उकळी आणावी.