गोडी पुणेरी आमटी – Goda Masala Maharashtrian – Puneri Amti : तुरीच्या डाळीची गोड्या मसाल्याची आमटी ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय आमटी आहे. गोडी आमटी ही खूप छान व खमंग लागते. ह्या आमटीत गोडा मसाला, चिंच किंवा आमसूल व गुळ आहे त्यामुळे आंबट-गोड चव लागते. मेथ्या दाणे घातल्याने खमंग लागते. ही आमटी गरम-गरम भाता बरोबर साजूक तूप घालून सर्व्ह करावी चवीला अगदी अप्रतीम लागते.
गोडी पुणेरी आमटी बनवण्यासाठी वेळ : २५ मिनिट
वाढणी : २ जणांसाठी
साहित्य :
१ कप तुरडाळ
२-३ कोकम (आमसूल)
किंवा १ टे स्पून चिंच कोळ
गुळ व मीठ चवीने
१ टे स्पून कोथंबीर
१ टे स्पून ओला नारळ (खोवून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गोडा मसाला पावडर – See – Making Goda Masala at home
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१/२ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून मेथी दाणे
१/४ टी स्पून हळद पावडर
५-६ कडीपत्ता पाने
कृती :
तुरडाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घ्या व त्यामध्ये गुल, मीठ, लाल मिरची पावडर, गोडा मसाला हळद पावडर, आमसूल १ एक एक पाणी घालून मिक्स करून ठेवा.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, मेथी दाणे, कडीपत्ता पाने घालून त्यामध्ये शिजवलेली डाळ मिक्स करून त्यामध्ये ओला नारळ, कोथंबीर व पाहिजे असल्यास थोडे पाणी मिक्स करून चांगली उकळी आणा.
गरम गरम आमटी भाता बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Maharashtrian Style Godi Amti is published in this – Article
The Marathi language video of the same Maharashtrian/ Puneri Godi Amti recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=-xwlBxpWzZE