कोथंबीरीच्या करंज्या : करंजी म्हटल की महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा व लोकप्रिय पदार्थ आहे. आपण नेहमीच गोड करंज्या बनवतो जरा वेगळ्या पद्धतीने बनवल्या तर चांगल्या लागतील. कोथंबीरीच्या करंज्या ह्या नाश्त्याला, लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला करण्यासाठी छान आहेत. कोथंबीरीच्या करंज्या चवीला खूप टेस्टी लागतात.
कोथंबीरीच्या करंज्या बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १८ करंज्या
साहित्य भरण्यासाठी :
१ कोथंबीरीची छोटी जुडी
१ छोटा नारळ (खोवलेला)
१/२ टे स्पून आले (बारीक चिरून)
१/२ टे स्पून लसून (बारीक चिरून)
४-५ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१/२ टे स्पून खस-खस (भाजून)
१/२ टी स्पून गरम मसाल, मीठ चवीनुसार
पारीसाठी :
३ कप मैदा
१ १/२ टे स्पून गरम तेल
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून धने-जिरे पावडर
२ टे स्पून दुध
मीठ चवीनुसार
तेल करंजी तळण्यासाठी
कृती : कोथंबीर धुऊन बारीक चिरून घ्या. नंतर त्यामध्ये खोवलेला नारळ, आले, लसून, हिरव्या मिरच्या, खस-खस भाजून, गरम मसाला व मीठ घालून मिश्रण तयार करा.
एका परातीत मैदा, तेलाचे कडकडीत मोहन, हळद, धने-जिरे पावडर, २ टे स्पून दुध व मीठ घालून पीठ चांगले घट्ट माळून घ्या दहा मिनिटानी त्याचे लहान गोळे करून पुरी लाटून त्यामध्ये १ टे स्पून मिश्रण ठेवून पुरी बंद करा व त्याला करंजीचा आकार द्या.
कढई मध्ये तेल गरम करून करंजी गुलाबी रंगावर मंद विस्तवावर तळून घ्या.
The English language version of the Kothimbir Karanji is published in this – Article