रताळ्याचा कीस Ratalyacha Kis for Fasting: उपवास म्हंटले की रताळ्याचे सुद्धा बरेच पदार्थ बनवता येतात. रताळ्या पासून रताळ्याची भाजी, हलवा, चकत्या, पुऱ्या बनवता येतात. रताळ्याचा कीस सुद्धा छान लागतो. रताळे म्हणजेच स्वीट पोट्याटो किंवा शकरकंद होय. शकरकंद हे हिंदीत म्हणतात. रताळ्याच्या किसात जिरे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे कुट, लिंबू रस, चवीला साखर घातल्या मुळे अगदी चवीस्ट लागतो.
The Marathi language video of this Upvasacha Sweet Potato Kees or Potato Kees can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Traditional Upvasacha Ratalyacha Kis
रताळ्याचा कीस बनवण्यासाठी वेळ : २० मिनिट
वाढणी : २ जणासाठी
साहित्य :
२ मोठी रताळी
३-४ हिरव्या मिरच्या
१/४ कप नारळ (खोवलेला)
१/४ कप कोथंबीर
१/४ कप शेंगदाणे कुट
१ टे स्पून लिंबू रस
साखर व मीठ चवीने
फोडणी साठी
१ टे स्पून तूप (वनस्पती तूप चालेल)
१ टी स्पून जिरे
६-७ कडीपत्ता पाने
कृती :
रताळी धुवून, सोलून, किसून घ्या. कीस पाण्यात घालून ठेवा. शेंगदाणे भाजून सोलून कुट करून घ्या. मिरच्याचे तुकडे करून घ्या. नारळ खोवून घ्या. कोथंबीर धुवून चिरून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये जिरे, हिरव्या मिरच्या. कडीपत्ता व मीठ घाला. (रताळ्याचा कीस पाण्यातून काढा. त्यातील पाणी थोडे दाबून काढा.) मग रताळ्याचा कीस कढईमधे घालून मिक्स करा. २ मिनिट कढई वर झाकण ठेवून मंद विस्तवावर शिजू द्या. मग त्यामध्ये लिंबू रस व साखर घालून मिक्स करून २ मिनिट चांगली वाफ येवू द्या.
गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना खोवलेला नारळ व कोथंबीर घाला.