चॉकलेट करंजी Chocolate Karanji : चॉकलेट करंजी ही दिवाळीच्या वेळेस बनवायला छान डीश आहे. महाराष्ट्रीयन लोकांची आवडती व लोकप्रिय डीश आहे. तसेच चॉकलेट म्हंटले की सगळ्यांना आवडते. चॉकलेट करंजी म्हंटले तर अजुनच छान होईल. ह्या दिवाळी सणाला ह्या करंज्या नक्की बनवून पहा सगळ्यांना आवडतील व आपल्या करंज्या वेगळ्याच व चवीला पण सुंदर होतील.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५-१७ करंज्या बनतात
साहित्य : पारी साठी :
१ कप रवा
१ कप मैदा
१/४ कप गरम तेल (मोहन)
मीठ चवीला
सारणासाठी :
२ कप खवा
१ कप पिठीसाखर
१/४ कप ड्रिकिंग चॉकलेट पावडर
१/४ कप काजू-बदाम तुकडे (भरड)
१ टी स्पून वेलचीपूड
कारंजी तळण्यासाठी तूप
कृती : पारी साठी : रवा, मैदा, मीठ, गरम तूप मिक्स करून पीठ घट्ट माळून २ तास बाजूला ठेवा. मग थोडे कुटून पीठ चांगले मळून घ्या व त्याचे एक सारखे गोळे बनवा.
सारणासाठी : खवा किसून घ्या. मग त्यामध्ये पिठीसाखर, ड्रिकिंग चॉकलेट पावडर, काजू-बदाम भरड, वेलची पावडर घालून मिक्स करून सारण तयार करून घ्या.
एक एक गोळा घेवून पुरी सारखा लाटा व त्या पुरीला कडेनी थोडेसे दुध लावा व १ टे स्पून सारण भरून पुरी बंद करून त्याला मधोमध मुडपून घ्या. असे दोन वेळा मुड्पा म्हणजे अधिक ह्या चिन्हा सारखा आकार येईल. अश्या सर्व करंज्या बनवून घ्या. बनवत असतांना ओल्या कापडा मध्ये ठेवा म्हणजे सुकणार नाही.
कढईमधे तूप गरम करून करंज्या गुलाबी रंगावर तळून घ्या.