स्ट्रॉ्बेरीची करंजी (Strawberry Karanji): स्ट्रॉ्बेरी करंजी दिसायला व चवीला खूपच छान लागते. आपण गुलकंदाची, चॉकलेटची व नारळाची कारंजी बनवतो आता स्ट्रॉrबेरीची कारंजी बनवा नक्की सगळ्यांना आवडेल. ह्या वेळेस दिवाळी फराळ निराळा बनवा. ह्या करंजीमध्ये पल्प वापरला आहे त्यामुळे चवीला अगदी निराळी लागते. ह्या करंज्या ८-१० दिवस टिकतात कारण की नारळ शिजवून घेतला आहे.
स्ट्रॉ्बेरीची करंजी बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २२ करंज्या
साहित्य :
सारणा साठी :
२ कप नारळ कीस (खोऊन) (Coconut grated)
२ कप दुध (Milk)
३/४ कप साखर (Sugar)
२ टे स्पून स्ट्रॉlबेरी पल्प (Strawberry Pulp)
१ टी स्पून वेलचीपूड (Cardamom Powder)
आवरणा साठी :
२ कप मैदा (Refined Flour)
२ थेंब खायचा लाल रंग (Eatable Red Colour)
मीठ चवीने (Salt as per taste)
२ टे स्पून तूप (मोहन साठी) (Dalda Ghee)
तूप कारंजी तळण्यासाठी (Ghee for frying the karanji)
कृती : सारणासाठी : एका कढई मध्ये खोवलेला नारळ, दुध व साखर मिक्स करून घट्ट होई परंत मंद विस्तवावर शिजवून घ्या. घट्ट होत आले की स्ट्रॉ्बेरी पल्प व वेलचीपूड घालून परत थोडे कोरडे होई परंत शिजवून घ्या. थंड झाले की थोडेसे मिक्सरमधून काढा.
आवरणा साठी : मैदा, मीठ व गरम तुपाचे मोहन घालून मिक्स करून त्याचे दोन भाग करा, एका भागा मध्ये लाल रंग घालून मिक्स करून थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. दुसरा भाग तसाच मळून घ्या. दोन्ही मळलेली पीठे १५-२० मिनिट बाजूला ठेवा. मग त्याची मोठी पोळी वेगवेगळी लाटून घ्या.
एका प्लेटमध्ये १ टे स्पून तांदळाचे पीठ व १ टे स्पून तूप घेवून फेटून घ्या. मिक्स केलेले तांदळाचे पीठ एका पोळीवर एक सारखे लावून त्यावर दुसरी पोळी ठेवा व त्याची घट्ट वळकटी करून घ्या. मग त्या वळकटीचे १” चे तुकडे कापून घ्या. एक एक तुकडा घेवून त्याची पुरी लाटून घ्या व त्या पुरीच्या कडेनी थोडेसे दुध लावून १ टे स्पून सारण ठेवून पुरी दुमडून घ्या व कडेनी थोडी दाबून घेवून कटरने कापून घ्या. अश्या सर्व करंज्या करून घ्या. करंज्या सुकू नये म्हणून थोड्या ओलसर कापडात ठेवाव्यात.
कढई मध्ये तूप गरम करून करंज्या तळून घ्याव्यात.