||शुभ दीपावली ||
दिवाळी किंवा दीपावली ही महाराष्ट्रातील लोकांचा आवडता व महत्वाचा सण आहे. दिवाळी सण हा सगळ्या सणांचा राजा म्हटले तरी चालेल. दसरा झाला की प्रतेक घरात महिला आपल्या घराची साफसफाई करतात व दिवाळीच्या फराळाच्या तयारीला लागतात.
दीपावलीच्या वेळेस फराळाचे पदार्थ बनवताना माराष्ट्रात कारंजी, बेसन लाडू, रवा-नारळ लाडू, चंपाकळी, चकली, चिवडा, गोड शंकरपाळे, खारे शंकरपाळे, शेव, अनारसे, बर्फी ई पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ बनवण्यासाठी रेसिपी देत आहे. त्यासाठी ही – दिवाली फराळाची माहिती बघा.
दिवाळीच्या फराळाची तयारी आगोदरच करावी म्हणजे आयत्यावेळी काही गडबड होणार नाही. आपल्याला फराळाचे कोणते पदार्थ बनवायचे आहेत व त्यासाठी कोणकोणते जीनस लागणार आहेत ह्याची आगोदरच यादी करावी व त्याप्रमाणे जीनस आणून ठेवावेत.
वेलचीपूड : वेलदोडे आणून तवा गरम करून वेलदोडे थोडेसे गरम करून घेवून साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. मग पूड घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी व फराळ जेव्हा बनवायचा तेव्हा वेलचीपूड वापरावी म्हणजे त्याच्या सुवास तसाच राहील.
बेसन : चण्याची डाळ आणून त्याचे डोळे असतील तर काढावे व चांगले उन देवून डाळ दळून आणून बेसन घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावे.
करंजीचे सारण : नारळ खोवून करंजीचे सारण आधल्या दिवशीच बनवून ठेवावे.
चकलीची भाजणी : चकलीची भाजणी बनवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी.
चिवडा बनवण्यासाठी : चिवडा करण्यासाठी शेंगदाणे भाजून साले काढून ठेवावीत. सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून ठेवावेत. चिवड्याचा मसाला बनवून ठेवावा.
पिठीसाखर : लाडू बनवण्यासाठी साखर बारीक करून ठेवावी.
ड्राय फ्रुट : काजू-बदामचे पातळ काप करून ठेवावे. लाडू बनवण्यासाठी थोडे कुटून ठेवावेत.
अनारसा : अनारसे बनवण्यासाठी आगोदरच अनारस्याचे पीठ बनवून ठेवावे.
पोहे, रवा, मैदा, पिठीसाखर ताजी आणून वापरावी.
दिवाळीच्या वेळेस पणत्या लावण्यासाठी आगोदरच पणत्या आणून ठेवाव्यात, वाती बनवून ठेवाव्यात. रांगोळी व रांगोळीचे रंग आणून ठेवावेत. अभ्यंग स्नान करण्यासाठी सुंगधी उटणे, सुंगधी तेल, सुगंधी साबण आधीच आणून ठेवावा. फराळ देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या, रंगीत पेपर आणून ठेवावेत.
धनत्रयोदशीच्या पूजेसाठी आधीच दिवे आणून ठेवावेत. तसेच धने व गुळ पण आणून ठेवावा.
लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मी देवीचा फोटो अथवा प्रतिमा आणावी, साळीच्या लाह्या, बत्तासे, फुले, लक्ष्मीची पावले, पूजेचे सामान तयार ठेवावे. जर कोणाला काही भेटवस्तू द्यायची असेल तर आणून ठेवावी. ही दिवाळीची तयारी आगोदरच करून ठेवावी.