आंबा-नारळ लाडू (Mango Naral Ladu): आंबा नारळ लाडू हे मुलांसाठी बनवायला फार छान आहेत. तसेच ते बनवायला सोपे व लवकर होणारे आहेत. आंबा हा फक्त सीझनमध्ये मिळतो. त्यामुळे आंब्याचा रस हा टीन मधला वापरला तरी चालेल. हे लाडू उपासाला सुद्धा चालतात.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: २० छोटे लाडू
साहित्य :
१ नारळ (खोवून)
१ कप दुध
१ कप साखर
१ कप हापूस आंब्याचा रस
१ टी स्पून वेलचीपूड
कृती : एका कढई मध्ये खोवलेला नारळ, दुध घालून १०-१५ मिनिट मंद विस्तवावर शिजत ठेवा. मग त्यामध्ये साखर, आंब्याचा रस घालून परत शिजत ठेवा. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करा. थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळा.
The English language version of the Amba-Naral Ladoo is published in this – Article