रगडा पॅटीस – Ragda Pattice : रगडा पॅटीस ही सर्वाची आवडती डीश आहे. खर म्हणजे रगडा पॅटीस ही डीश नॉर्थ मधील लोकप्रिय आहे. पण आता महाराष्ट्रात सुद्धा ही लोकप्रिय आहे. चाट म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. कारण ह्या डीश आंबटगोड व छान चमचमीत असतात. ह्या मध्ये बटाट्याचे पॅटीस बनवले आहेत. रगडा हा हिरवे किंवा पांढरे वटाणे वापरून बनवला आहे. वरतून चिंचेंची आंबटगोड चटणी वापरली आहे. व सजावटीसाठी कांदा, कोथंबीर, टोमाटो व शेव वापरली आहे. त्यामुळे रगडा पॅटीस ची चव अप्रतीम लागते.
बनवण्यासाठी वेळ:४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
पॅटीससाठी
६ मध्यम आकाराचे बटाटे
२-३ हिरव्या मिरच्या
१” आले तुकडा
२ ब्रेड (क्रम)
मीठ चवीने
तेल पॅटीस फ्राय करण्यासाठी
रगडा साठी :
२ कप हिरवे किंवा पांढरे वटाणे (७-८ तास भिजवून ठेवा)
१ टे स्पून तेल
१ टी स्पून आले-लसून पेस्ट
१ मोठा कांदा
१ मध्यम आकाराच्या टोमाटो
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
मीठ चवीने
चिंचेची चटणी करीता :
१/४ कप चिंच
२ टे स्पून गुळ
१ टे स्पून साखर
१/४ टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
कांदा, टोमाटो, कोथंबीर बारीक चिरून
१/२ कप बारीक शेव
कृती :
रगडा : वटाणे ७-८ तास पाण्यात भिजत घाला मग चांगले शिजवून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून कांदा, टोमाटो, आले-लसून पेस्ट घालून थोडे परतून घ्या मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ व उकडलेले वाटाणे घालून चांगले शिजवून घ्या.
पॅटीस : बटाटे उकडून सोलून कुस्करून घ्या व त्यामध्ये हिरवी मिरची, आले, मीठ, ब्रेड (क्रम) घालून मिक्स करून त्याचे चपटे गोळे करा. फ्राईग पॅनवर तेल घालून गुलाबी रंगावर भाजून घ्या.
चिंचेची चटणी : चिंच अर्धा तास भिजत ठेवा व त्याचा कोळ काढून घ्या. मग त्यामध्ये गुळ, साखर, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, मीठ घालून चांगली उकळी आणून थंड करायला ठेवा.
एका प्लेट मध्ये दोन पॅटीस ठेवून त्यावर १/२ कप शिजवलेला रगडा घाला वरतून चिंच चटणी, कांदा, कोथंबीर, टोमाटो व शेव घालून सजवा.
The English language of the Ragda Pattice preparation with Chinchechi Chutney has been published in this – Article