शाही मसाला दुध – Shahi Masala Doodh for Sharad -Kojagiri Purnima : मसाला मिल्क हे महाराष्टात कोजागिरी पौर्णिमेला अगदी आवर्जून करतात. हे मसला दुध पौस्टिक तर आहेच व टेस्टला पण खूप छान लागते. कोजागिरी पौर्णिमेला देवीची पूजा करून घरात देवीची पावले काढून आनंदी वातावरण ठेवले जाते. शरद पौर्णिमा ह्या दिवशी रात्री जागरण करून चांदण्या रात्री मसाला दुध आटवून सगळ्यांना दिले जाते. नाच, गायन ह्याचा प्रोग्राम केला जातो, चटपटीत भेळ व मसाला दुध बनवले जाते. मसला दुधामध्ये काजू, बदाम, पिस्ते, जायफळ पूड, वेलचीपूड व केसर वापरले आहे.
शाही मसाला दुध शरद पौर्णिमासाठी बनवण्यासाठी वेळ : २५ मिनिट
वाढणी : ५ जणांसाठी
साहित्य :
१ लिटर दुध (म्हशीचे)
१ १/२ कप साखर (गोडी आपल्या आवडीनुसार)
८-१० काजू
८-१० बदाम
७-८ पिस्ते
१/४ टी स्पून जायफळ पूड
१ टी स्पून वेलचीपूड
८-१० केसर काड्या
चरोळी (आवडत असल्यास)
कृती : काजू, बदाम, पिस्ताची पूड करून घ्या. जायफळ किसून घ्या. वेलचीपूड करून घ्या.
दुध गरम करून १० मिनिट मंद विस्तवावर आटवून घ्या. त्यामध्ये साखर मिक्स करूनपरत ५-७ मिनिट आटवून घ्या.
मग त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते ची पूड, जायफळ पूड, वेलचीपूड, केसर घालून मिक्स करून घ्या.
सर्व्ह करतांना गरम-गरम सर्व्ह करा.
The English language version of the Sweet Maharashtrian Style Masala Milk is published in this – Article