चीज शंकरपाळे -Cheese Shankarpali:
चीज म्हटले की लहान मुलांना फार आवडते. तसेच ते किती पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. चीजचे शंकर पाळे हे चवीला फार छान लागतात. ह्या दिवाळीला बनवून बघा सगळ्यांना नक्की आवडतील. आपल्या फराळामध्ये ही एक वेगळीच डीश आहे.
The English language version of the Cheese Shankarpali for Diwali Faral recipe is published in this – Article
The Marathi language video Tasty Crispy Cheese Shankarpali Or Cheeslings For Diwali Faral can be seen on our YouTube Channel: Tasty Crispy Cheese Shankarpali Or Cheeslings For Diwali Faral
चीज शंकरपाळे बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ कप चीज (किसून)
२ कप मैदा
१/२ टी स्पून मिरे पावडर
चिमुट खायचा सोडा
१ टी स्पून मीठ
२ थेंब पिवळा खायचा रंग (पावडर)
२ टे स्पून तेल (गरम)
तेल चीजचे शंकरपाळे तळण्यासाठी
कृती : मैदा, रंग व सोडा चाळून घ्या. चीज किसून घेवून त्यामध्ये मीठ, मिरे पावडर घालून मिक्स करा. चीजमध्ये मैदा व गरम तेल घालून चांगले मिक्स करून घ्या.
पीठ घट्ट मळायचे आहे.
त्यासाठी पीठ मळताना लागेल तसे पाणी वापरा. पीठ सैल झालेतर तेल खूप लागेल व शंकरपाळी तेलकट होईल.
पीठ घट्ट मळून झाले की अर्धातास बाजूला ठेवा. मग त्याचे एकसारखे गोळे बनवून पोळी लाटून घ्या व मग सुरीने छोट्या-
छोट्या शंकरपाळ्या कापा.
कढईमधे तेल गरम करून शंकरपाळ्या गुलाबी रंगावर तळून घ्या.
शंकरपाळी थंड झालीकी प्लास्टिक पिशवीमध्ये भरून ठेवा.
The English language version of the Cheese Shankarpali for Diwali Faral recipe is published in this – Article