शाही शिंगाड्याच्या पीठाचे लाडू – Water Chestnut Flour Ladoo : शिंगाड्याच्या पीठाचे लाडू उपवासासाठी करतात. तसेच इतर वेळेस सुद्धा बनवता येतील. हे लाडू खूप पौस्टिक आहेत. लाडू बनवतांना ह्यामध्ये सुके खोबरे, व ड्राय फ्रुट वापरले आहेत. शिंगाड्याचे लाडू ही उपसासाठी स्वीट डीश होईल. खर म्हणजे शिंगाडा हे एक फळ आहे.
शिंगाडा – Water Chestnuts : शिंगाडा हे एक औषधी फळ आहे. ते खूप पौस्टिक आहे पण पचायला थोडे जड असते. शिंगाडा हे शक्ती दायक आहेत तसेच रक्त व आपली शरीर सुद्रुड बनवते. ह्यामध्ये प्रोटीन, लोह, खनिजे, जीवनसत्व “ए” आहे.
शिंगाड्याच्या पीठापासून शिरा, खीर, चटपटे दाणे, लाडू, दशम्या, पुरी, भजी बनवता येते व हे पदार्थ खूप स्वादीस्ट पण लागतात. हे पीठ पचायला हलके असते.
आजारी माणसांना शिंगाड्याच्या पीठापासून बनवलेली खीर दिली तर त्याच्या त्यांना नक्की फायदा होईल त्याचे शरीर सुद्रुड बनेल व त्यांना पोषण मिळेल. बाळंतीनीला पण ह्याची खीर रोज द्यावी त्यामुळे शक्ती येते.
महाराष्ट्रात शिंगाड्याच्या पीठापासून वेगवेगळे पदार्थ उपवासासाठी बनवले जातात. ह्याची थालपीठ बनवण्यासाठी पण वापर केला जातो. ह्याची भजी व चटपटीत दाणे तर खूपच छान लागतात.
शाही शिंगाड्याच्या पीठाचे लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५-१७ लाडू बनतात
साहित्य :
२ कप शिंगाड्याचे पीठ
१ कप पिठीसाखर
१/२ कप सुके खोबरे (किसून)
१/४ कप दुध
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून जायफळ पावडर
१/२ कप साजूक तूप
थोडे ड्राय फ्रुट जाडसर पूड करून
कृती : कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ घालून थोडे ब्राऊन रंगावर भाजून घ्या, व त्यामध्ये दुध घालून परत मंद विस्तवावर २-३ मिनिट भाजून घ्या. सुके खोबरे भाजून हातानी चुरून घ्या. मग भाजलेल्या पीठामध्ये पिठीसाखर, वेलचीपूड, सुके भाजलेले खोबरे, वेलची पूड, जायफळ पूड, ड्राय फ्रुट घालून मिक्स करून थोडे थोडे तूप घालून लाडू वळून घ्या.
The English language version of the Recipe for Shingada (Water Chest-nuts) Ladoos is published in this – Article