कोथंबीरीची बेसन पीठ पेरून भाजी : कोथंबीरीचे किंवा धनियाची पीठ पेरून भाजी महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. ह्या भाजीमध्ये फोडणी मध्ये लसूण घातला आहे. त्यामुळे त्याची टेस्ट चांगली व खमंग लागते. कोथंबीरीची भाजी बनवायला फार सोपी आहे तसेच लवकर बनणारी आहे. ही भाजी प्रवासाला जातांना पुरी बरोबर घ्यावी फार चवीस्ट लागते.
कोथंबीरीची बेसन पीठ पेरून भाजी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ३ जणासाठी
साहित्य :
१ कोथंबीर जुडी किंवा ४ कप कोथंबीर बारीक चिरून
३/४ कप बेसन
१ टे स्पून ओले खोबरे (खोवून)
३ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
फोडणी साठी
१ टे सस्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
६-७ लसूण (थोडे चेचून)
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती : प्रथम बेसन ३-४ मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. कोथंबीर निवडून, धुवून, चिरून घ्या व १० मिनिट बाजूला ठेवा.
कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, लसूण, हिंग, हिरवी मिरची, हळद, मीठ घालून मग चिरलेला कोथंबीर घालून मिक्स करून कढईवर २-३ मिनिट झाकण ठेवा. नंतर झाकण काढून बेसन घालून मिक्स करा व थोडेसे कोरडे होई परंत शिजवून घ्या.
सर्व्ह करतांना ओल्या खोवलेल्या नारळाने सजवा व चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Besan Peeth Perun Kothimbir Chi Bhaji is published in this – Article