नाचणी ओट लाडू : नाचणीलाच रागी सुद्धा म्हणतात. नाचणी पासून आपण शिरा, खीर, डोसे बनवतो. त्याचे लाडू सुद्धा बनतात. नाचणी ही खूप पौस्टीक आहे. लहान मुलांना मुद्दामून नाचणीची खीर देतात. थंडीत तर रोज नाचणी खावी. नाचणीचे लाडू फार स्वादिस्ट लागतात. मुलांना शाळेत जातांना रोज एक लाडू डब्यात द्यावा. ह्या लाडूमध्ये नाचणी, गव्हाचे पीठ व ओट आहेत त्यामुळे हे लाडू मुलांना नक्की द्या. तसेच हे लाडू गरोदरपणात नक्कीच फायद्याचे आहेत.
नाचणी ओट लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ लाडू
साहित्य :
१ कप नाचणीचे पीठ
१ कप गव्हाचे पीठ
१ कप ओट
१ १/४ कप पिठीसाखर
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ कप काजू-बदाम तुकडे
३/४ कप साजूक तूप
२ टे स्पून वनस्पती तूप
कृती : कढई मध्ये १ टे वनस्पती स्पून गरम करून त्यामध्ये नाचणीचे पीठ चांगले भाजून घेवून एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
मग १ टे स्पून वनस्पती स्पून गरम करून गव्हाचे पीठ छान गुलाबी रंगावर भाजून घेवून बाजूला ठेवा.
ओट कढई मध्ये थोडेसे परतून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडेसे एकदाच फिरवा.
भाजलेले नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, ओट, पिठीसाखर व वेलचीपूड घालून मिक्स करा. लाडू वळताना थोडे पीठ व थोडेसे तूप घालून मळून घेवून त्याचे लाडू वळून घ्या. असे सर्व लाडू बनवून घ्या.
The English language version of the Finger Millets Flour-Oats Ladoo preparation method is given in this – Article