मोड आलेल्या मुगाची उसळ : मोड आलेल्या मुगाची उसळ फार चवीस्ट लागते. मुग हे पचायला हलके असतात व ते गुणकारी पण आहेत्त. हिरवे मुग हे जास्त गुणकारी असतात. मोड आलेल्या मुगाचे उसळ मुलांना चपाती बरोबर शाळेत जातांना डब्यात देता येईल. ह्याची उसळ बनवायला सोपी आहे व झटपट होणारी आहे.
मोड आलेल्या मुगाची उसळ बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप मोड आलेले मुग
१ टे स्पून ओला नारळ
१ टे स्पून कोथंबीर
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
५-६ कडीपत्ता पाने
१/४ टी स्पून हिंग
१ छोटा कांदा(बारीक चिरून)
१ टे स्पून आले-लसूण (बारीक चिरून)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१/४ टी स्पून हळद
कृती : प्रथम मोड आलेले मुग धुवून थोडेसे पाणी घालून कुकर मध्ये एक शिटी काढून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता पाने, हिंग, कांदा, आले-लसून, हिरवी मिरची व हळद घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये शिजवलेले मुग घालून थोडे परतून घ्या. ओले खोबरे व कोथंबीर घालून मिक्स करा.
गरम गरम उसळ चपाती बरोबर सर्व्ह करा.
टीप : उसळ बनवतांना जर लोखंडाची कढई वापरली तर उत्तम होईल.
The English language version of the Sprouted Green Gram or Moong Dal Usal preparation method is published in this – Article