थालपीठ भाजणी कशी बनवायची : थालपीठ भाजणी घरच्या घरी कशी बनवायची. थालपीठ भाजणी बनवतांना बाजरी, तांदूळ, हरभरा डाळ, ज्वारी, गहू, धने व काळे उडीद हे वापरले आहेत. त्यामुळे ते किती पौस्टिक आहे ते आपल्याला समजले असेलच. काळे उडीद म्हणजे साल असलेले उडीद ते फार पौस्टिक असतात.
बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिट
साधारणपणे २ किलोग्राम भाजणी बनते.
साहित्य :
१/२ किलोग्राम (४ कप) बाजरी
१/४ किलोग्राम (२ कप) तांदूळ
१/४ किलोग्राम (२ कप) हरभरा डाळ
१/४ किलोग्राम (२ कप) ज्वारी
१/४ किलोग्राम (२ कप) गहू
१२५ किलोग्राम (१ कप) काळे उडीद
१२५ किलोग्राम (१कप) धने
कृती : बाजरी, तांदूळ, हरभरा डाळ, ज्वारी, गहू, उडीद व धने हे सर्व न धुता मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. थंड झाल्यावर थोडेसे जाडसर दळून आणा.
टीप : सर्व धान्ये मंद विस्तवावर भाजून घ्या.
भाजणी थोडी जाडसर दळून आणावी म्हणजे थालपीठ छान खमंग होतात.
दळून आणलेली भाजणी प्लास्टिक पिशवीत घट्ट बांधून ठेवावी. म्हणजे ५-६ महिने टिकते.
The English language version of the Thalipeeth Bhajani preparation method is published in this – Article
The Marathi language video of this Traditional Maharashtrian Bhajani can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=wfry-59FBtQ